आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
बालविवाह
बालविवाह

सोनई – नेवासा तालुक्यातील सोनई येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दीड वर्षांपूर्वी बालविवाह लावून देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती, सासू-सासरे आणि पीडितेच्या जन्मदात्या आईवर ‘पोक्सो’सह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रसूती कळांमुळे पीडितेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

बालविवाह

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सोनई येथील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या (नाव बदललेले आहे, वय १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह दीड वर्षांपूर्वी तिच्या आईने स्वतःच्या भावाचा मुलगा अविनाश भाऊराव वैरागर याच्याशी लावून दिला होता. हा विवाह कोणत्याही मंगल कार्यालयात न होता, सोनई येथील घरीच अत्यंत साध्या पद्धतीने ‘माळ घालून’ पार पडला होता. या विवाहास पीडितेची आई मुक्ता सुनील आव्हाड, सासरे भाऊराव वैरागर आणि सासू शोभा वैरागर हे उपस्थित होते.

बालविवाह

प्रसूती कळांमुळे फुटले गुपित
लग्नानंतर पीडिता तिच्या पतीसोबत सोनई येथेच राहत होती. या दरम्यान पती अविनाश याने पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याने ती गर्भवती राहिली. दि. २३ मार्च २०२६ रोजी पीडितेच्या पोटात तीव्र कळा येऊ लागल्याने पती, सासू आणि आईने तिला उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील डॉक्टरांच्या तपासणीत मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. रुग्णालयाने तातडीने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली.

पोलिस कारवाई व गुन्ह्याची व्याप्ती
सिव्हिल हॉस्पिटलमधून माहिती मिळताच सोनई पोलीस स्टेशनचे पथक रुग्णालयात पोहोचले. पीडितेने दिलेल्या जबाबावरून सोनई पोलीस ठाण्यात आरोपी अविनाश भाऊराव वैरागर (पती), भाऊराव वैरागर (सासरे), शोभा भाऊराव वैरागर (सासू).
मुक्ता सुनील आव्हाड (पीडितेची आई) यांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बालविवाह

सदर कारवाई मा. अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) आणि मा. उपविभागीय अधिकारी (शेवगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोरे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोसई सुरज मेढे हे करत आहेत. या घटनेमुळे सोनई परिसरात खळबळ उडाली असून बालविवाहाच्या प्रथेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

बालविवाह

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

बालविवाह
बालविवाह

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

बालविवाह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!