नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचाराचे प्रकरण उघड झाले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांवर विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचाराचे प्रकरण उघड झाले आहे. धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप करण्यात येत आहे. महिला विनयभंग आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झाले आहेत. 6 आरोपींना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेऊन SITची (विशेष तपास पथक) स्थापना करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. सर्व खासगी संस्थांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. आणखी पीडित महिलांच्या तक्रारीसाठी पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी 9123232311 तसेच कंट्रोल रूम 112 वर संपर्क करता येणार आहे. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. भोंदू बाबा अशोक खरात नंतर नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीतील आणखी महिलांचे लैंगिक शोषणाचा प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सर्व आरोपींना थोड्याच वेळात नाशिकच्या सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणानंतर नाशिकमध्ये महिला लैंगिक अत्याचार असे अनेक प्रकरण समोर आले आहेत. भोंदू अशोक खरात, रवींद्र एरंडे प्रकरणानंतर आणखी एक महिला लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समो आले आहे. या प्रकरणात देखील चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







