आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रस्ता

रास्ता रोको आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधले

नेवासा –१४ एप्रिल रोजी मक्तापुर व म्हसले येथे मराठा सुकाणू समितीचे प्रदेश अध्यक्ष गणेश झगरे यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यांत आले या आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना गणेश झगरे यांनी सांगितले की, म्हसले-मक्तापुर गावांमधील रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

रस्ता

त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तात्काळ रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थ तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबतील. ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव घेतला की, जर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही, तर येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये म्हसले व मक्तापुर येथील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकतील आंदोलनात सहभागी प्रमुख ग्रामस्थः गणेश भाऊ झगरे, गोरख नवघरे, रितेश साळवे, भानुदास शिरसाठ, पूनमचंद साळवे, संभाजी शिरसाठ, दत्ता गव्हाणे, अनिल साळवे, दत्ता शिरसाठ आदींची उपस्थिती होती.

रस्ता
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रस्ता
रस्ता
रस्ता

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रस्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!