आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा


घोडेगाव— वारकरी संप्रदायातील १० ते १२ पिढ्यांपासून चालत आलेली पायी वारीची अखंड परंपरा, अनुष्ठान आणि भक्तीभाव जपणाऱ्या आदरणीय महाराज मंडळींबाबत तसेच पूज्य भास्करगिरी महाराज यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा सोनई येथील देवगड भक्त परिवार व सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला..दि. २०एप्रिल रोजी सकाळी ११वाजता सोनई बस स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून ते सोनई पोलीस ठाण्या पर्यंत सर्व भक्त परिवार व सकल हिंदू समाज कार्यकर्ते पायी मोर्चाने गेले. यावेळी सोनई पोलीस ठाण्या समोर मोर्चेकर्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत निषेध केला.

गुन्हा

या प्रकरणी सविस्तर असे कि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते
विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाया मध्ये हिंदूत्ववादी विचारांची घुसखोरी काही महाराज मंडळी करत असल्याचे सांगत २०महाराज मंडळीची यादी जाहीर केली.यामध्ये नेवासा तालुक्यातील दत्त देवगड येथील महंत भास्करगिरी महाराज यांच्या विषयी केलेल्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या व भक्त परिवाराच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप यावेळी मोर्चात करण्यात आला आहे. देवगड भक्त परिवार व सकल हिंदू समाजाच्या
या संदर्भात संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम २९९ (अन्यायकारक कृत्य/भावना दुखावणे संदर्भात) अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा ठाम निर्णय सकल हिंदू समाज बांधवांनी घेतला आहे.

गुन्हा


या आंदोलनात मोठ्या संख्येने वारकरी, भाविक व समाजातील विविध घटक सहभागी झाले होते. समाजात शांतता राखत, पण ठाम भूमिका घेत न्याय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी हभप पंढरीनाथ महाराज तांदळे यांनीही याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी करत वारकरी संप्रदायाच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.
यावेळी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी विकास लवांडे यांचा देवगड भक्त परिवार आणि सोनई परिसर सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. तसेचविकास लवांडे यांनी भास्करगिरी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी भक्त परिवाराने केली आहे.या वक्तव्यामुळे नेवासा तालुक्यातील भाविक भक्तांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

गुन्हा

मोर्चेकर्यांनी आपल्या भावना मोर्चा द्वारे व्यक्त केल्या असून याबाबत वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्या नंतर सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून संबंधीत पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येईल.
——अनिल मोरे –सपोनि सोनई पोलीस ठाणे.

गुन्हा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गुन्हा
गुन्हा
गुन्हा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!