नेवासा तालुक्यातील माडेगव्हाण शिवारातील घटना.
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील माडेगव्हाण शिवारात एका ६२ वर्षीय शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भागवत नारायण शिरसाठ (वय ६२, रा. माडेगव्हाण, ता. नेवासा. ) यांनी दिनांक १९ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी संजय भागवत शिरसाठ (वय ४१) यांनी सोनई पोलीस ठाण्यात खबर दिली सदरच्या खबरीवरुन, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार मच्छिंद्र आडकित्ते हे करीत आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







