आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शेतकरी

उन्हाळ्यातच खत गायब; खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी कोण खातंय? पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे सचिव आदिनाथ पटारे यांचा प्रशासनाला थेट सवाल.

नेवासा : नेवासा तालुक्यात सध्या रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याचे चित्र असून, कागदोपत्री मोठ्या प्रमाणात खतसाठा दाखवला जात असताना प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उन्हाळ्याच्या काळातच खतांचा तुटवडा भासू लागल्याने येणाऱ्या खरिप हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकरी


तालुक्यातील अनेक खत विक्री केंद्रांवर “साठा संपला” खत शिल्लक नाही असे ग्राहकांना सांगितले जाते. मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या नोंदीत खत उपलब्ध असल्याचे दाखवले जात असल्याने नेमके खत जातेय कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही ठिकाणी काळाबाजार, साठेबाजी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताचा संशयही व्यक्त केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ पटारे यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी थेट प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे—
“कागदोपत्री खतांचा साठा भरपूर दाखवला जातो, मग प्रत्यक्षात शेतकऱ्यांना खत का मिळत नाही? हा साठा नेमका कुठे जातोय? कोणाच्या आशीर्वादाने साठेबाजी सुरू आहे? शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?”

शेतकरी


पटारे यांनी पुढे इशारा देत सांगितले की, जर तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल.
दरम्यान, कृषी विभागाने याबाबत अद्याप ठोस भूमिका स्पष्ट केलेली नसून, “पुरवठा सुरळीत आहे” असे सांगितले जात आहे. मात्र वास्तवात शेतकरी खतासाठी मात्र गेल्या सहा महिन्यापासून भटकंती करत असल्याचे चित्र तालुक्यात स्पष्ट आहे. खत विक्रेत्याकडून शेतकऱ्यांची होणारी पिळुनुक व अवाजवी दराने खत विक्री अनेक तक्रारी येऊन देखील कृषी विभाग कडून अद्याप पर्यंत एकही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही. कृषी विभागाचे अधिकारी तालुक्यात एवढा सावळा गोंधळ असून देखील गप्प का?? एकही कृषी सेवा केंद्रावर कार्यवाही नाही..

शेतकरी


प्रशासनासमोर आता मोठे प्रश्न :
खतांचा साठा असूनही विक्री का होत नाही?
काळाबाजार आणि साठेबाजीला कोणाचा पाठिंबा? उन्हाळ्यात जर घट्ट जाई असेल तर खरीप हंगामात काय???
खरिप हंगामापूर्वी नियोजन फक्त कागदावरच का?? अगदी पाच किलोमीटर असलेला गंगापूर तालुक्यात कायगाव टोका येथे बाराही महिने खत मुबलक प्रमाणात उपलब्ध असते नेमकं नेवासा तालुक्याचा कोठा जातोय कुठे??? गंगापूर तालुक्यात खत मिळतंय नेवाशात का नाही याचं गोड बंगाल नेमकं काय??? हा नेवासा तालुक्यातील शेतकऱ्याकडे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खताचा बफर स्टॉक खुला करून लिंकिंग प्रक्रिया बंद करावी व शेतकऱ्याला मुबलक खताची पूर्तता करावी अशी मागणी नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांची कडून होत आहे.

शेतकरी


या संपूर्ण प्रकरणामुळे नेवासा तालुक्यात प्रशासनाविरोधात रोष वाढत असून, यामध्ये कृषी विभागाचे काही भ्रष्ट व निष्क्रिय अधिकारी सामील असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून लवकरच या भ्रष्ट व निष्क्रिय अधिकाऱ्याबद्दल निलंबनाचीकारवाईची मागणी करणार असल्याचे पटारे यांनी सांगितले . शेतकऱ्यांना वेळेत खत मिळाले नाही, तर येणारा हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेतकरी
शेतकरी
शेतकरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेतकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!