
देवगड फाटा – नेवासा तालुक्यातील खुपटी गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत दणदणीत विजय संपादन करणारे गोरक्षनाथ तनपुरे हे जळके बुद्रुक गावचे जावई असल्याने जळके बुद्रुक येथील ग्रामस्थांनी त्यांच्या खुपटी येथील गावी जाऊन भव्य सत्कार करत आपुलकीचे नाते जपले.

खुपटी गावात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यास जळके बुद्रुक येथील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांच्या वतीने गोरक्षनाथ तनपुरे यांना फेटा, शाल, पुष्पहार व वस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

खुपटी येथील सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत गोरक्षनाथ तनपुरे यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत मतदारांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या कार्यपद्धतीवर व प्रभावी लोकसंपर्कावर विश्वास ठेवत मतदारांनी त्यांना मोठ्या फरकाने विजयी केले. त्यांच्या विजयामुळे खुपटीसह जळके बुद्रुक गावातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी गिनंदेव झगरे, पत्रकार इकबाल शेख, प्रदीप झगरे, किरण निपुंगे, ऍड. नकुल झगरे, बाळासाहेब थोरात, अनिल झगरे, सुनील झगरे, गणेश झगरे,अविनाश झगरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी गोरक्षनाथ तनपुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, खुपटी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कारभार राबविणार आहे. जळके बुद्रुक हे माझे सासर असल्याने या गावाशी असलेले नाते अधिक दृढ ठेवेन.
या सत्कार कार्यक्रमामुळे दोन्ही गावांमधील आपुलकीचे व स्नेहाचे नाते अधिक दृढ झाले असून सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण पाहायला मिळाले. .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








