नेवासा फाटा – नेवासा तालुक्यातील बऱ्हानपूर येथील प्रगतशील शेतकरी विजयराव चव्हाण यांचे चिरंजीव डॉ. सौरभ विजय चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षणामध्ये एमबीबीएस ही पदवी संपादन केल्याबद्दल मक्तापूर ग्रामस्थांच्या वतीने तसेच मराठा सुकानू समिती व गणेशभाऊ झगरे मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.

डॉ. सौरभ चव्हाण हे मक्तापूर येथील तुकाराम पाटील बर्डे यांचे नातू व लक्ष्मणराव पाटील बर्डे यांचे भाचे आहेत. अत्यंत प्रतिकूल आणि गरीब परिस्थितीतून त्यांनी जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असतानाही त्यांनी नेट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत एमबीबीएस पदवी प्राप्त केली.

त्यांच्या या यशामुळे बऱ्हानपूर व मक्तापूर परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यानिमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा सुकानू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे यांच्या हस्ते भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच तुकाराम पाटील बर्डे व लक्ष्मण पाटील बर्डे यांच्या निवासस्थानीही विशेष सत्कार समारंभ पार पडला.

यावेळी गणेश भाऊ झगरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “सौरभसारखा युवक उच्च पदावर पोहोचल्याने मक्तापूर गावाची मान उंचावली आहे. त्याचा आदर्श प्रत्येक युवकाने घ्यावा. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कोणतीही गोष्ट साध्य करता येते.” तुकाराम पाटील बर्डे यांनीही भावना व्यक्त करत सांगितले की, “सौरभने रात्रंदिवस कष्ट करून हे यश संपादन केले आहे. त्याचे वडील विजयराव यांनीही मोठे कष्ट घेत मुलाला या उंचीवर पोहोचवले. हे यश खऱ्या अर्थाने मेहनतीचे फळ आहे.”

या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी तुकाराम पाटील बर्डे, बाळासाहेब देवराव बर्डे, मराठा सुकानू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश भाऊ झगरे, पोलीस पाटील अनिल लहारे, माऊली कृषी सेवा चे मालक शिवाजी दगडू बर्डे, कचरू भाऊ जामदार, संभाजी पोपटराव बर्डे, अमोल जामदार, गणेश कांगुणे, दत्तात्रय कोळेकर सर, सौरव कांगुणे, तंटामुक्त अध्यक्ष दत्ताभाऊ कांगुणे, युवा नेते मनोज झगरे, मच्छिंद्र पांडागळे, आजिनाथ सुभाष बर्डे, प्रदीप बर्डे तसेच मक्तापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.








