
नेवासा – राष्ट्रीय जनगणना मोहिमेसाठी तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, घराघरातील माहिती संकलनासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे. तहसीलदार डॉ. संजय बिरादार व अप्पर तहसिलदार श्रीमती. सोनाली म्हात्रे तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. नगरपंचायत हद्दीसह तालुक्यातील सर्व गावांमध्ये घरांची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी एकूण 619 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण दिनांक 27/04/2026 पासून सुरू झाले असुन. पहिल्या टप्प्यात 250 प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले. एकूण 3 टप्प्यांत ३ दिवसांचे सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

1 मे ते 15 मे पर्यंत स्वगणनेस सुरुवात झाली असुन 16 मे पासुन प्रत्यक्ष घरगुती जनगणना सुरू होणार असून, नागरिकांनी प्रगणकांना अचूक व संपूर्ण माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी मुख्य जनगणना अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत तर ग्रामीण भागासाठी तहसीलदार आणि शहरासाठी मुख्याधिकारी चार्ज अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळतील. प्रगणकांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी ६ प्रगणकांमागे १ पर्यवेक्षक अशा पद्धतीने एकूण 105 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक प्रगणकाला सुमारे १८० ते २०० घरे किंवा अंदाजे 700 ते 800 लोकसंख्येची माहिती संकलित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

तरी 1 मे ते 15 मे पर्यंत जास्तीस जास्त नागरीकांनी स्वगणना करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ. संजय बिरादार व अप्पर तहसिलदार श्रीमती. सोनाली म्हात्रे तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







