घोडेगाव—- नेवासा तालुक्यातील चांदा येथून कत्तली साठी डांबून ठेवलेल्या गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करण्यात आली. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १५ रोजी रात्री दहा वाजता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे कर्मचारी हे पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गुप्त माहिती च्या आधारे तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार परिसरातील अवैध धंद्यांची माहिती काढत असताना सोनई पोलीस ठाण्याचे हद्दीत चांदा गावात बस स्थानका जवळील काटवनात काही गोवंशीय जिवंत जनावरे हे कत्तल करणे कामी डांबून ठेवले आहे.

तसेच काही गोवंशीय जनावरांची कुरेशी मोहल्ला येथे पत्र्याच्या शेडमध्ये कत्तल चालु आहे. मिळालेल्या गुप्त माहिती नुसार पंचासमक्ष पहाणी करत छापा टाकला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाहताच तेथील आरोपी यांनी अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. त्या ठिकाणाहून तेरा गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका करण्यात आली. त्याचबरोबर २२० किलो गोमांस देखील जप्त करण्यात आले. असा एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे यांच्या फिर्यादी वरून फरार आरोपी लियाकत इस्माईल कुरेशी,

साजिद इस्माईल शेख, साकिब जावेद शेख, इर्शाद कदिर कुरेशी, हसनाईन शौकत शेख, गौस मोमीन शेख सर्व राहणार चांदा यांच्या विरुद्ध गुन्हा र नं. महाराष्ट्र पशु संवर्धन कायदा कलम ५(अ), ५(ब), ५(क), ९( अ), बिएन एस चे कलम ३(५) व प्राण्यांना निर्दयतेने वागविणे चे कलम ३,११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करण आहेत सदरील कारवाई अहील्यानगर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, यांचे आदेशान्वये गुन्हे अन्वेषण विभागाचे किरणकुमार कबाडी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ झांबरे, पोलीस काॅस्टेबल रोहित यमुल, चालक पोलीस काॅस्टेबल अरुण मोरे यांच्या पथकाने केली


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







