
नेवासा तालुक्यातील गोंडेगाव येथे रविवारी (२४ मे) रात्री दुर्दैवी अपघातात २६ वर्षीय रामदास अर्जुन सुसे यांचा मृत्यू झाला. भेंडा येथील संत नागेबाबा ग्रामीण पतसंस्थेत कार्यरत असलेले रामदास काम आटोपून दुचाकीवरून घरी परतत होते. घराजवळ पोहोचण्याआधीच त्यांच्या दुचाकीची रस्त्यालगतच्या लिंबाच्या झाडाला जोरदार धडक बसली. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने नातेवाइकांनी शोध घेतला असता ते गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमवारी गोंडेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, नऊ महिन्यांचा मुलगा व भाऊ असा परिवार आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







