आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
जायकवाडी

नेवासा – नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे दि.२६ मे रोजी विठ्ठल मंदिरामध्ये जायकवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्न संबंधात सांगोपांग चर्चा झाली. जायकवाडी धरणग्रस्त पुनर्वसन होऊन ५२ वर्षे झाली काही प्रश्न सुटले असले तरी नव्याने काही प्रश्न निर्माण झाले आहे त्या प्रश्नांच्या संदर्भात कृषी शास्त्रज्ञ व माजी कुलगुरू डॉक्टर अशोकराव ढगे यांनी सविस्तर निवेदन अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांना दिले.

जायकवाडी

    जमिनीच्या वर्गीकरणाबाबत हिंगे यांनी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना देऊन जागेवर अनेक नियम उलगडा करून प्रश्न सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी  डॉक्टर अशोकराव ढगे यांनी मच्छीमारांचा प्रश्न मांडून जायकवाडी धरणाच्या पाण्यावर चांगल्या जातीचे मत्स्यबीज सोडावे तसेच स्मशानभूमीच्या संदर्भात अधिक निधी उपलब्ध करून द्यावा आणि या भागात होत असलेली वृक्षतोडीच्या संदर्भात वनविभागाला गांभीर्याने सूचना कराव्यात धरणग्रस्त गावांना जोडणारी रस्ते तसेच वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वतंत्र सबस्टेशनसाठी महावितरणाला सूचना द्याव्यात अशा प्रश्नांचा उहापोहो डॉक्टर ढगे यांनी यावेळी बोलतांना केला.

जायकवाडी


    याप्रसंगी अप्पर तहसीलदार सोनाली मात्रे,नेवासा नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ.करणसिंह घुले,जेष्ठ कार्यकर्ते टोका येथील माजी उपसरपंच वसंतराव डावखर, ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव,केशव वाघमारे, मोहिनीराज कदम,दत्तात्रय आगळे,संतोष कोरडे, भाऊसाहेब चव्हाण,सर्कल कुसमुडे यांच्यासह प्रवरासंगम, टोका माळेवाडी,खेडले काजळी,मंगळापूर व पंचक्रोशीतील शेतकरी धरणग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

जायकवाडी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

जायकवाडी
जायकवाडी
जायकवाडी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

जायकवाडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!