शेतकऱ्यांचा संताप : शेतात पाय ठेवल्यास आत्मदहनाचा इशारा
सोनई- प्रस्तावित राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गासाठी भूसंपादन करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना बेल्हेकरवाडी (ता. नेवासे) येथे शेतकरी त्र ग्रामस्थांनी घेराव घालून विरोध केला. ‘शेतात पाय ठेवाल, तर आत्महत्या करू’, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. त्यानंतर संबंधित भूमिअभिलेख व रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी लेखी विरोध बेऊन काढता पाय घेतला. भूसंपादन प्रक्रिया थांबताच उपस्थितांनी ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’ ‘विकास नव्हे भकास निर्णय मान्य नाही’, अशा घोषणा देत आनंद साजरा केला.

शनिभक्तांचे दर्शन सुलभ व्हावे, तीर्थक्षेत्राचा विकास, तसेच उद्योग व व्यवसायास चालना मिळावी, याकरिता राहुरी ते शनिशिंगणापूर मार्गावर नवीन (ल्वेमार्ग करण्यास मंजुरी भेटल्यानंतर प्रशासनाने वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, श्रीरामवाडी, सोनई, हनुमानवाडी, कांगोणी व शिंगणापूर येथील शेतकऱ्यांची बागायती जमीन प्रकल्पात जात असल्याने विरोध वाढत गेला. संतप्त शेतकऱ्यांनी या प्रकल्पास हरकत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती नोंदवून आपली कैफियत मांडली होती.

आज भूसंपादनकरिता अधिकाऱ्यांची वाहने येताच संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी वाहनास घेराव घातला. अनिल निमसे, डॉ. ज्ञानेश्वर दरंदले, संतोष निमसे, शरद पाटीलबा गडाख, डॉ. शुभम गडाख, कैलास कोरडे, योगेश जोशी व शेतकऱ्यांनी विरोध केला.
काही शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा देताच अधिकाऱ्यांनी विरोध लेखी स्वरूपात द्या, अशी सूचना केली.कुठलाही संवाद न करता व विश्वासात न घेता कार्यवाही सुरू असल्यावद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व लोकप्रतिनिधींना निवेदन दिले असल्याचे अनिल बाबासाहेब निमसे यांनी सांगितले.

भूमिअभिलेख व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची संतप्त भावना लक्षात घेऊन भूसंपादन करून देणार नाही याबाबत लेखी देण्याची सूचना करून आपली भावना जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात येईल, असे सांगितले. हा प्रसंग सहज झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे. यापुढे सुद्धा विरोध प्रखर राहण्यासाठी विशेष संघटन करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







