आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अपंग
अपंग

नेवासा – येथील तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांच्या कार्य तत्परतेमुळे नेवासा शहर मध्यमेश्वरनगर प्रभागातील पॉलिओग्रस्त सूरज लालचंद डोंगरे या सात वर्षीय अपंग बालकाला जीवदान मिळाले आहे.जमिनीवर सरपटत चालणारा हा बालक उपचारानंतर चालू लागला आहे, याबद्दल तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांचा बालकांच्या मातापित्यांनी सत्कार करून त्यांचे आभार मानले असून या बालकाला तहसीलदार यांनी डोल सुरू केल्याने मोठा आधार ही मिळाला आहे.

अपंग

याबाबत सविस्तर माहिती अशी की मोलमजुरी कामाच्या निमित्ताने लालचंद डोंगरे व सौ.पुष्पा डोंगरे हे दाम्पत्य हे पुणे परिसरात आपली उपजीविका करत होते त्यांचा सात वर्गीय पॉलिओग्रस्त मुलगा नेवासा येथे आजीकडे रहात असल्याने शिधा पत्रिकेत नाव नसल्याने सूरज यास पुढील उपचार घेता येत नव्हते ही बाब पत्रकार सुधीर चव्हाण यांनी तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांच्या कानावर घातली तेव्हा त्यांनी लगेचच सुरजचे आजीच्या शिधापत्रिकेत नाव समाविष्ट केले व वैद्यकीय सेवा मोफत मिळावी म्हणून लगेचच पत्र उपलब्ध करून दिले त्यामुळे लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये सूरजवर सुमारे दोन महिने मोफत उपचार करण्यात आले.

अपंग

आतापर्यंत जमिनीवर सरपटत जीवन जगत असलेल्या सूरजला उपचार घेत असतांना त्याच्या वडिलांनी घेतलेल्या सरावामुळे तो उभे राहून पाऊले टाकू लागला.याचे श्रेय सूरजच्या आईवडीलांनी तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांना दिले.आमची परिस्थिती हलाखीची असल्याने आम्हाला उपचार करणे शक्य नव्हते मात्र ते तहसीलदार डॉ.बिरादार साहेबांमुळे शक्य झाले असल्याचे सूरजचे वडील लालचंद डोंगरे यांनी सांगितले.

अपंग

तहसीलदार डॉ.संजय बिरादार यांच्या या पुण्याच्या कार्याबद्दल त्यांचा तहसीलच्या दालनात सन्मान करण्यात आला.यावेळी प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण,महसुल अधिकारी अशोक गाडेकर,सुनील साळुंके,जनसेवक गणेश चौगुले,बालक सूरज डोंगरे,आई पुष्पा डोंगरे, वडील लालचंद डोंगरे उपस्थित होते. तहसीलदार डॉ.बिरादार यांच्या या तत्परतेने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अपंग
अपंग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपंग
अपंग
अपंग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!