आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
प्रताप दराडे
प्रताप दराडे

नेवासा – नेवासा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराला भेट देत माऊलींच्या पवित्र ‘पैस खांबा’चे दर्शन घेतले. नवीन जबाबदारीची सुरुवात श्रद्धा आणि आध्यात्मिकतेच्या वातावरणात केल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक भावना व्यक्त होत आहेत.

प्रताप दराडे

यावेळी दराडे यांनी मंदिर परिसरात दर्शन घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळासह ऐतिहासिक ‘पैस खांबा’ला वंदन केले. या प्रसंगी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोलीस हवालदार अजय साठे, पोलीस नाईक संदीप बर्डे तसेच दराडे यांचे मित्र राजाभाऊ सातपुते, दीपक शेठ बोरगे आणि रियाज शेख उपस्थित होते.

प्रताप दराडे

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या वतीने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांचा सत्कार करण्यात आला. मंदिर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे व शिवाजी होन यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.

प्रताप दराडे

दर्शनानंतर बोलताना पोलीस निरीक्षक प्रताप दराडे म्हणाले, “श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराबाबत आणि ‘पैस खांबा’च्या ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्वाबाबत खूप ऐकले होते. जगाच्या पाठीवर खांबासाठी प्रसिद्ध असलेले हे एकमेव मंदिर आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी याच पवित्र स्थळी ज्ञानेश्वरीचे निरूपण केले. माऊलींच्या कृपेने आज येथे दर्शन घेण्याचा योग आला, हे माझे भाग्य समजतो.”

प्रताप दराडे

मंदिर परिसरात यावेळी भाविकांची मोठी उपस्थिती होती. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षकांनी घेतलेले हे दर्शन धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक वारसा आणि कर्तव्यनिष्ठेचा सुंदर संगम असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

प्रताप दराडे

नेवासा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने काम करत असतानाच स्थानिक संस्कृती आणि श्रद्धास्थानांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या या भेटीची परिसरात सकारात्मक चर्चा सुरू आहे.

प्रताप दराडे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

प्रताप दराडे
प्रताप दराडे
प्रताप दराडे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

प्रताप दराडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!