आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पोलीस

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील सोनई येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे निखिल अशोक तमनर यांना प्रशासकीय सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आधार फाऊंडेशन राहुरी यांच्या वतीने देण्यात येणारा हा यंदाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभागृहात पार पडला. अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष गुंदेजा हे होते.

पोलीस

या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोलीस काॅस्टेबल निखिल तमनर यांना सपत्नीक ट्राॅफी व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तमनर हे गेली अनेक दिवसांपासून पोलीस खात्यामध्ये अविरतपणे आपली सेवा बजावत आहेत. या कार्यक्रमासाठी साई आदर्श मल्टीस्टेट चे शिवाजी कपाळे,राहुरी चे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, ह. भ. प. राधिका खेमनर, वंचीत चे अध्यक्ष संतोष चोळके, यशवंत सेनेचे अध्यक्ष विजय तमनर, शिवसेना नेते रावसाहेब खेवरे सह मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आधार फाऊंडेशन व एस आर न्युज चे रमेश खेमनर, संस्थेच्या अध्यक्षा ह. भ. प. राधीका खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!