आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शनेश्वर देवस्थान
शनेश्वर देवस्थान

घोडेगाव :दि. १४-श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानच्या दानपात्रात मागील महिनाभरात भाविकांनी रोख, सोने व चांदीच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर देणगी अर्पण केली असून, रोख स्वरूपात ६४ लाख ७२ हजार ४६१ रुपये दान प्राप्त झाले आहे. याशिवाय सोने व चांदीच्या स्वरूपातही लाखो रुपयांची देणगी मिळाली आहे.

शनेश्वर देवस्थान

शुक्रवार, दि. १२ जून रोजी देवस्थानच्या उदासी महाराज सभागृहात सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आणि कडक सुरक्षा व्यवस्थेत दानपात्रातील रकमेची मोजणी करण्यात आली. यावेळी देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या उपस्थितीत सकाळपासून मोजणीला सुरुवात झाली.

शनेश्वर देवस्थान

शनिशिंगणापूर मंदिर परिसरात एकूण १८ दानपात्रे असून, मागील महिनाभरातील सर्व दानपात्रे उघडून त्यातील रक्कम मोजण्यात आली. नुकतीच झालेली शनी जयंती आणि शनी अमावस्या यानिमित्त देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. त्यामुळे यंदा दानाच्या रकमेतही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.

शनेश्वर देवस्थान

दानपात्रातील देणगीचा तपशील :
नोटा : ₹६१,९६,३६१
चिल्लर : ₹२,७६,१००

एकूण रोख : ₹६४,७२,४६१

शनेश्वर देवस्थान

मौल्यवान देणगी :
सोने : ₹२,१९,९३६
चांदी : ₹२९,४६०
एकूण सोने-चांदी : ₹२,४९,३९६
देवस्थान प्रशासनाने संपूर्ण मोजणी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने सीसीटीव्ही देखरेखीखाली पूर्ण केली. भाविकांनी दाखविलेल्या श्रद्धा आणि विश्वासामुळे देवस्थानला मोठ्या प्रमाणात देणगी प्राप्त होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

शनेश्वर देवस्थान

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शनेश्वर देवस्थान
शनेश्वर देवस्थान
शनेश्वर देवस्थान

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शनेश्वर देवस्थान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!