आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मावा

घोडेगाव — नेवासा तालुक्यातील सोनई येथे अवैधरित्या सुरू असलेल्या मावा केंद्रावर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी छापेमारी केली. या बाबत सविस्तर माहिती अशी की दि. १० रोजी संध्याकाळी आरोपी सुहास अशोक भुसारी (वय.२०)रा.बेल्हेकरवाडी गेट हा आपल्या सोनई ते राहुरी रोड लगत सब स्टेशन जवळील आपल्या राहत्या घरालगत असलेल्या पत्र्याच्या दोन खोल्या मधे मावा बनवण्यासाठी लागणारी सुंगधी तंबाखू व तयार मावा हा आरोग्यासाठी हानिकारक आहे, त्यामुळे शरीरास बाधा पोहचते

मावा

या बाबत इसमास माहिती असुन देखील स्वतः चे आर्थिक फायदा साठी त्यांनी प्रतिबंधीत अन्न पदार्थांची विक्री साठी साठा करून महाराष्ट्र शासन यांचे अधिसूचना क्रमांक असुमाअ/अधिसूचना/४११/२०२५/७ दि. १६/७/२०२५ चे उल्लंघन केलेले असल्याचे आढळले आहे. त्या ठिकाणाहून विविध प्रकारची ५३ हजार ३५० रुपयांची सुंगधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी उज्वला रमन पाटील यांनी संबंधित व्यक्ती विरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा र नं. २६५/२०२६ बिएन एस चे कलम १२३,२२३,२७४,२७५,सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६

मावा

व त्या खालील नियम व नियमने २०११ चे कलम ५९,२६(२) (आय), २६(२)(आय व्ही), २७(३), (डी), २७(३) (ई) सह वाचन कलम ३०(२), (अ) , सह वाचन (झेड झेड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी गावात आल्याचे समजताच सुरू असलेल्या टपऱ्या अवघ्या मिनिटामध्ये बंद करून दुकानदारांनी याचा धसका घेत आपला गाशा गुंडाळून पोबारा केला.

मावा
मावा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मावा
मावा
मावा

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!