
घोडेगाव – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सोनई पोलीसांनी कारवाई केली. या बाबत पोलीस सुत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार दि. १५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास येथील बस स्टॅण्ड जवळील पत्र्याच्या टपरी मध्ये फारुख ईमामसाहब पठाण (वय.५४), पप्पू उर्फ आकाश मच्छिंद्र टेमकर दोघे राहणार घोडेगाव हे विना परवाना कल्याण मटका नावाचा जुगार खेळताना व खेळविताना मिळुन आले.

१५००० रुपये किंमतीचा मोबाईल व ३७० रुपये रोख रक्कम खेळ खेळण्यासाठी लागणारे साहित्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.नवनाथ महादु पवार (वय.४५) , पप्पू उर्फ आकाश मच्छिंद्र टेमकर दोघे राहणार घोडेगाव हे गावातील स्मशान भुमी जवळ एका पत्र्याच्या टपरी मध्ये कल्याण मटका नावाचा हारजितीचा खेळ खेळताना व खेळविताना मिळुन आले.

६१० रुपये रोख रक्कम व खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा मुद्देमाल या ठिकाणाहून जप्त करण्यात आला. पोलीस काॅस्टेबल महेंद्र पवार यांच्या फिर्यादी वरुन सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे! पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्ता गावडे हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.




कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







