
घोडेगाव : प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत दारूच्या नशेत एस.टी. बस चालविणाऱ्या चालकाविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली असून या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनई पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 270/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 85(1) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी प्रशांत ज्ञानदेव घुले (वय 38 वर्षे), डेपो मॅनेजर, नेवासा बस डेपो यांनी फिर्याद दिली आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये आनंद भूपाल कांबळे (रा. देवाळे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) आणि बस वाहक साईप्रसाद राजकुमार अतिग्रे (रा. शिवाजी पेठ, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. ही घटना दि. 14 जून 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता घोडेगाव येथील हॉटेल दीपक समोर घडली.

पोलिसांनी तपासणीदरम्यान एमएच-14 एलएक्स-8985 क्रमांकाची एस.टी. बस अडवली असता चालकाने मद्यप्राशन केल्याचे निदर्शनास आले. चालक दारूच्या नशेत बस चालवत असल्याची खात्री झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली.

प्राथमिक वैद्यकीय तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र, घोडेगाव येथे करण्यात आली. त्यानंतर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार एन.आर. तुपे करीत असून, कारवाईत डी.एम. गावडे, ए.एच. तमनर यांच्यासह पोलीस पथकाने सहभाग घेतला.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी सार्वजनिक वाहतूक सेवेत कार्यरत असलेल्या चालकांकडून जबाबदारीची अपेक्षा असताना दारूच्या नशेत बस चालविण्याचा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. अशा घटनांमुळे शेकडो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







