घोडेगाव — महिलेवर अत्याचार करून चाकूने वार करणाऱ्या नराधम आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा नेवासा न्यायालयाने सुनावली आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की या खटल्यातील २८ वर्षीय पिडीत महिला आणि आरोपी बाबासाहेब क्षिरसागर हे दोघे एकत्र जागरण गोंधळाचे कार्यक्रम करत असल्याने ते एकमेकांना परिचित होते. दि. २४ जुन २०२४ रोजी फिर्यादी तिच्या माहेरी असताना आरोपीने तिला आपल्याला गोंधळाचा कार्यक्रम असल्याचे खोटे सांगून फत्तेपूर येथील बस स्थानकावर बोलावून घेतले. त्या ठिकाणाहून तिला घोडेगाव रस्त्याने चालत फिरण्याच्या बहाण्याने नेले.

सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कठड्यावर बसले नंतर खांद्यावर हात ठेवून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी ने त्यास प्रतिकार केला असता बळजबरीने आडबाजूला नेऊन लैगिक अत्याचार केला. त्यास प्रतिकार करत असताना आरोपीने चाकूने फिर्यादी यांच्या मानेवर वार करत जखमी केले. तसेच अंगावरील सोन्याची दागिने लुटून नेले. तु जर कुणाला काही सांगशील तर तुला जिवे ठार मारील अशी धमकी देऊन घटना स्थळावरून पळ काढला. जखमी महिलेला रस्त्याने जाणाऱ्या नागरीकांनी पुढील उपचारासाठी अहील्यानगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले.

पोलीसांना दिलेल्या जबाबावरुन शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात भादवी (आय पी सी) कलम ३७६,३२७,५०४,५०६अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तत्कालीन पोलीस निरीक्षक खगेंद्र टेभेंकर तपासाची चक्रे तातडीने फिरवत आरोपीला अटक करून दोषारोप पत्र नेवासा येथील जिल्हा न्यायालयात दाखल केले. न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. या मध्ये पिडीत महिला, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

मा. न्यायालयाने पुरावे, साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीला आयपिसी कलम ३०७ खाली दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे विष्णुदास भोर्डे यांनी युक्तिवाद केला तर त्यांना महिला पोलीस कर्मचारी स्वाती तडुलकर यांनी सहकार्य केले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







