आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
Crime News

Crime News : अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी रस्त्यालगत असलेल्या जंगलात जळालेल्या अवस्थेत अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. श्रीगोंदा पोलिसांना मुलीची ओळख पटवण्यात यश आले असून या प्रकरणातील आरोपी पिता-पुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Crime News

श्रीगोंदा शहरातील आरोपी शुभम ओव्हाळ आणि सुखदेव ओव्हाळ असे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. प्रेमसंबंध आणि चारित्र्याच्या संशयावरून अल्पवयीन मुलगी आणि शुभम यांच्यात वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात शुभम ओव्हाळ याने लोखंडी रॉड आणि फरशीच्या साहाय्याने मुलीवर हल्ला करून तिच्या डोक्यात गंभीर दुखापत केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. 

Crime News

खून केल्यानंतर वडिलांच्या मदतीने मृतदेह आधी घरी लवपला. नंतर मृतदेह गादीमध्ये गुंडाळून वडाळी रोडवरील जंगल परिसरात पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचा प्रयत्न केला. मोटरसायकलवरून गादीत गुंडाळलेला मृतदेह वडाळीच्या जंगलात नेला. तेथे लाकूड गोळा करून पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मृतदेह जळेपर्यंत पिता-पुत्र तिथेच थांबून होते. जंगलामध्ये दोघेजण पहाटे काहीतरी जाळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ पडताळणी केली. पहाटे वडाळी रोड परिसरातील जंगलात जळालेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरली.

Crime News

मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर परिस्थिती जन्य पुराव्याच्या आधारे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. शुभमने एका मित्राला फोन आणि व्हिडिओ कॉलवर प्रेयसीच्या हत्येची कबुली दिली. याच मित्राने यासंदर्भातील माहिती पोलिसांना दिली. शुभम ओव्हाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ या दोघांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेणगे यांनी दिली. डेप्युटी एसपी दिलीप तिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

आरोपींवर हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आणि संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला.

Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आपल्यासाठी सुचविले

error: Content is protected !!