आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
रघुवीर खेडकर

घोडेगाव : कला, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा अभिमान असलेले सुप्रसिद्ध तमाशा कलावंत पद्मश्री रघुवीर खेडकर यांनी नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या भेटीचा क्षण घोडेगावकरांसाठी आनंद आणि अभिमानाचा ठरला.

रघुवीर खेडकर

तमाशा कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला देशभर पोहोचविणाऱ्या रघुवीर खेडकर यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. या ऐतिहासिक सन्मानाबद्दल घोडेगाव येथे त्यांचा हृदयपूर्वक सत्कार करण्यात आला.

पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण जाधव व परिवाराच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्या कलासाधनेचा, संघर्षाचा आणि महाराष्ट्राच्या लोककलेला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

रघुवीर खेडकर

“महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा जपणाऱ्या अशा कलाकाराचा सन्मान करणे ही घोडेगावसाठी अभिमानाची बाब आहे,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी दिपक जाधव, दादा पाटील दरंदले, विष्णू चौधरी, अमोल जाधव, अशोक सातपुते, शफी शेख, गणेश महाडिक आरुष जाधव दादा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या उपस्थितीने घोडेगावच्या वातावरणात आनंद, प्रेरणा आणि अभिमानाची भावना निर्माण झाली.

रघुवीर खेडकर
रघुवीर खेडकर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

रघुवीर खेडकर
रघुवीर खेडकर
रघुवीर खेडकर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

रघुवीर खेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!