
नेवासा-मा. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि / हरिष भोये, पोउपनि/संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, महिला पोलीस अंमलदार सोनल भागवत, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.

दिनांक २२/०६/२०२६ रोजी नमुद पथक हे श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत हारेगाव फाटा शिवार ता. श्रीरामपुर येथे एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीत एक इसम हा गावठी कट्टा (पिस्टल) कब्जात बाळगुन फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने ग्रामीण रुग्णालयाचे पुढे एस कार्नर रोडजवळ सापळा रचुन थांबले असता. तेव्हा हारेगावकडुन श्रीरामपुरकडे जाणारे रोडने एक विना नंबरची स्कॉर्पिओ येतांना दिसली. तेव्हा पथकाने वाहन चालकास थांबविण्याचा इशारा करुन गाडीतील इसमास शिताफिने ताब्यात घेवुन त्यास नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव अविनाश धनराज माकोने वय-२७ वर्षे रा. निफाड जि. नाशिक असे असल्याचे सांगितले. सदर आरोपीविरुध्द यापुर्वी अहिल्यानगर व नाशिक या गुन्ह्यामध्ये एकुण ०९ गुन्हे दाखल आहे.

ताब्यातील इसमाची झडती घेतली असता त्याचे कब्जातुन १) ३०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल (अग्निशस्त्र), २) २०००/- रुपये किमतीचे ०२ जिवंत काडतुसे, १०,०००/-रु कि.ची एक मोबाईल, १५,००,०००/-रु.कि.ची एक स्कॉर्पिओ चारचाकी वाहन असा एकुण १५,४२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
-ताब्यातील इसमाविरुध्द पोकॉ/२०३ रमीजराजा रफीक आत्तार नेम स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ५९९/२०२६ आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल
करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







