आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मोकाट जनावरे
मोकाट जनावरे

वाहनचालक, पादचारी भयभीत; भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांत वाढ

नेवासा – नेवासा शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या श्वानांचा वाढता त्रास नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे वाहनचालक व पादचारी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरपंचायत निवडणुकीदरम्यान अनेक उमेदवारांनी भटक्या जनावरांच्या बंदोबस्ताचे आश्वासन दिले होते. मात्र निवडणुकीनंतर सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.

मोकाट जनावरे

शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यातच मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील खोलेश्वर गणपती चौकासह अनेक भागांमध्ये जनावरांचे कळप रस्त्यावरच ठिय्या मांडून बसत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

मोकाट जनावरे

तसेच, भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या शहरातील विविध भागांत मुक्तपणे फिरत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज कुत्र्यांच्या चावण्याच्या घटना घडत असल्याने अनेक नागरिकांना शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत.

मोकाट जनावरे

पादचारी नागरिक आणि वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक विशेषतः धास्तावलेल्या अवस्थेत आहेत. यापूर्वीही नागरिकांनी नगरपंचायतीकडे अनेक वेळा निवेदने देऊन मोकाट जनावरे व भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मोकाट जनावरे

या समस्येवर तातडीने उपाययोजना करून मोकाट जनावरे व भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मोकाट जनावरे
मोकाट जनावरे
मोकाट जनावरे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मोकाट जनावरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!