
नेवासा – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या पालखी पंढरपूर दिंडी सोहळ्यास तसेच संस्थानच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना आमच्या माध्यमातून शक्य तितकी व्यापक प्रसिद्धी देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन ह.भ.प.देविदास महाराज म्हस्के यांना नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर व सर्व पत्रकारांनी दिले आहे. यावेळी पत्रकार सौरभ मुनोत, सचिन कुरुंद, मंगेश निकम, सुमित पटारे, दादा दरंदले, अभिषेक गाडेकर, गणेश बेल्हेकर, युनूस पठाण, अविनाश येळवंडे, सोमनाथ कचरे सह तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.

यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिंडी सोहळ्याला शासकीय मान्यता प्राप्त झाल्याचे समजताच आम्हा सर्वांना अत्यंत आनंद व अभिमान वाटला. माऊलींचे भक्त म्हणून शासनाच्या या निर्णयाचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करीत आहोत.

या पत्राद्वारे आम्ही, नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे सर्व सदस्य, आपणास आश्वस्त करू इच्छितो की आपल्या पायी पंढरपूर दिंडी सोहळ्याला तसेच संस्थानच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना आमच्या माध्यमातून शक्य तितकी व्यापक प्रसिद्धी देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू.

या कार्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे मानधन, जाहिरात अथवा आर्थिक अपेक्षा न ठेवता, माऊलींची सेवा समजून आपल्या सर्व बातम्या व उपक्रमांना विनामूल्य प्रसिद्धी देऊ. माऊलींच्या कार्यात आपल्या परीने योगदान देण्याची ही आम्हा सर्व पत्रकारांची नम्र भावना आहे. माऊलींच्या कृपेने हा दिंडी सोहळा अधिकाधिक यशस्वी होवो हीच नेवासा तालुका एकता पत्रकार संघाची भावना आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







