
नेवासा – नेवासा येथील सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे व्यक्तिमत्त्व व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार यांनी रक्तदानाचे अर्ध शतक पूर्ण केल्याबद्दल त्यांचा गौरव एस बी आय बँकेचे शाखा प्रबंधक रणजित नाळे यांच्या हस्ते करण्यात आला.

शिवसेनेच्या शिकवणी प्रमाणे वीस टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण करीत असलेल्या बालेंद्र पोतदार यांनी आतापर्यंत समाजात उपेक्षित घटकांसाठी काम केले आहे,रक्तदान करणे हे पवित्र कार्य असल्याने मी स्व:त याठिकाणी तीन महिन्यांनी रक्तदान तर करतोच उलट इतरांना ही प्रवृत्त करतो,हे करत असतांना रक्तदानाचे अर्ध शतक झाले हे मला माझ्या नोंदीनुसार कळले.याचे मला समाधान वाटत असून शेवटच्या श्वासापर्यंत रक्तदानाचे पवित्र कार्य आपण करत राहू असा निर्धार बालेंद्र पोतदार यांनी यावेळी बोलतांना दिला.

यावेळी एस बी आयच्या झालेल्या रक्तदान शिबिरात बालेंद्र पोतदार यांनी आपल्या जीवनातील पन्नासावे रक्तदान करून रक्तदानाचे अर्धशतक पूर्ण केले.यावेळी झालेल्या सन्मान सोहळयाच्या प्रसंगी बालेंद्र पोतदार यांचा शाखा प्रबंधक रणजित नाळे यांच्या हस्ते बुके शाल व वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी वृक्ष मित्र अमृत फिरोदिया,सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ केंदळे,गोल्ड व्हॅल्यूयर कृष्णा डहाळे,शांताराम गायके, प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण, बँकेचे उपप्रबंधक राकेश कुकटला,विनोद चव्हाण, कॅशियर संदीप दुधाळे, विशाल आदिक,रुपाली काळे, दीपक गायकवाड,छोटू जिरे यांच्यासह बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







