घोडेगाव – नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे दि. २९ जून रोजी कापूस कांती योजना अंतर्गत साक्षी माता शेतकरी गटाच्या शेतकऱ्यांसाठी क्लोजर स्पेसिंग (सघन) कापूस लागवड पद्धती विषयक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी शेतकऱ्यांना ९० × ३० सें.मी. अंतरावर कापूस लागवडीचे फायदे, योग्य लागवड तंत्रज्ञान, अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाबी, संतुलित खत व्यवस्थापन, तण व कीड व्यवस्थापन तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना कापूस बियाण्यांचे वाटपही करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, मंडळ कृषी अधिकारी बबनराव कराड तसेच उपकृषी अधिकारी विजय बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन प्रकल्प समन्वयक तथा सहायक कृषी अधिकारी रुपेश पवार यांनी केले.

प्रशिक्षणास शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत क्लोजर स्पेसिंग पद्धतीचा अवलंब करून अधिक उत्पादन घेण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी साक्षी माता शेतकरी गटाचे अध्यक्ष श्री. पांडुरंग होंडे तसेच सचिव श्री रवींद्र पवार यांनी कापूस कांती योजनेचा प्रकल्प प्रभावीपणे व यशस्वीरीत्या राबविण्यासाठी कोणतीही कसूर केली जाणार नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन या वेळी केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







