आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
हद्दपार
हद्दपार

आपला जिल्हा – मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 56(1)(अ) व (ब) अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर भाग यांनी देवगाव (ता. नेवासा) येथील सागर वसंत नेटके (वय 26) यांच्याविरुद्ध दोन वर्षांसाठी हद्दपारीचा आदेश जारी केला आहे.

हद्दपार

आदेशानुसार, सागर वसंत नेटके यांनी आदेशाच्या तारखेपासून दोन दिवसांच्या आत अहिल्यानगर जिल्ह्याच्या हद्दीबाहेर निघून जाणे अथवा त्यांना जिल्ह्याबाहेर घालविण्यात येणार आहे. तसेच पुढील दोन वर्षांच्या कालावधीत उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश करता येणार नाही, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

हद्दपार

याशिवाय, हद्दपारीच्या कालावधीत महाराष्ट्र राज्यात इतरत्र वास्तव्यास असल्यास संबंधित परिसरातील नजीकच्या पोलीस ठाण्यात दर महिन्याला एकदा आपल्या राहत्या पत्त्याची माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. महाराष्ट्र राज्याबाहेर गेल्यास दहा दिवसांच्या आत संबंधित पोलीस ठाण्याला त्याची माहिती देणे, तसेच पुन्हा महाराष्ट्रात परतल्यानंतर दहा दिवसांच्या आत वास्तव्यास असलेल्या भागातील पोलीस ठाण्यात हजेरी व माहिती देणेही आवश्यक राहील.

हद्दपार

दरम्यान, या हद्दपार आदेशाविरोधात मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 60 अन्वये आदेशाची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांच्याकडे अपील दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

हद्दपार
हद्दपार

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

हद्दपार
हद्दपार
हद्दपार

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

हद्दपार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!