आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अवैध्य दारु
अवैध्य दारु

नेवासा – पोलीस स्टेशन हद्दीत अवैध्य व्यवसाय करणारे इसमांवर प्रतिबंध करणेकामी दिनांक 02/07/2026 रोजी दुपारी 14.10 वा.चे सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कुकाणा बस स्टॅण्ड येथे एक इसम हा मोटार सायकलवर देशी दारुसह येणार आहे.

अवैध्य दारु

अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सहा. पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोहेकॉ/2240 शहाजी आंधळे, पोकॉ/अमोल डमाळे, पोकॉ/हरिभाऊ धायतडक यांना कारवाई करणेकामी आदेशित केल्याने पोहेकॉ/2240 शहाजी आंधळे यांनी दोन पंचाना बोलावुन सापळा रचुन कुकाणा बस स्टॅण्ड येथे हिरो होंडा स्पेन्ल्डर कंपनीची मोटार सायकल नं.एम.एच.17 सी.यु.8492 ही वर इसम नामे संतोष रुस्तुम पोटे वय 42 वर्ष, रा.शिरसगाव ता. नेवासा जिल्हा अहिल्यानगर हा येत असताना त्यास 3,840/- रु.किं.च्या देशी दारु बॉबी संञा कंपनीच्या 48 सिलबंद बाटल्यासह ताब्यात घेवुन एकुण मुद्देमाल 53,840/-रुपये असा हस्तगत करण्यात आला आहे.

अवैध्य दारु

सदर घटनेबाबत पोकॉ/1022 अमोल शंकर डमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पो.स्टे गु.र.नं. 573/2026 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई), 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवैध्य दारु

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री.एम. सुदर्शन साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाकचौरे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निरज राजगुरु साहेब शेवगाव उपविभाग, शेवगाव यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे नेवासा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वात सहा. पोलीस निरीक्षक अमोल पवार, पोहेकॉ/2240 शहाजी आंधळे, पोकॉ/अमोल डमाळे, पोकॉ/हरिभाऊ धायतडक यांनी केली आहे.

अवैध्य दारु

नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहान करण्यात येते अशा प्रकारचे व्यवसाय करणारे इसमांबाबत काही माहिती असल्यास नेवासा पोलीस स्टेशन लँण्ड लाईन नंबर 02427-241233 यावर तसेच डायल 112 या प्रणालीवर फोन करुन माहिती द्यावी.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अवैध्य दारु
अवैध्य दारु
अवैध्य दारु

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अवैध्य दारु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!