आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
मृत्यू
मृत्यू

नेवासा फाटा | प्रतिनिधी विकास निपुंगे नेवासा तालुक्यातील खडका फाटा परिसरात रविवारी (१२ जुलै २०२६) दुपारी एका व्यक्तीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे १.०० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान डायल 112 वरून नेवासा पोलीस स्टेशनला माहिती प्राप्त झाली की, छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्गालगत असलेल्या एका विहिरीत लक्ष्मण दत्तात्रय भांगे हे पडले आहेत.

मृत्यू

माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी नेवासा फाटा येथील शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे.

मृत्यू

या घटनेबाबतची माहिती प्राथमिक स्वरूपाची असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. नेवासा पोलीस पुढील तपास करत आहेत.

मृत्यू

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

मृत्यू
मृत्यू
मृत्यू

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!