100 रुपयांच्या स्टॅम्पसाठी 140, तर 500 च्या स्टॅम्पसाठी 550 रुपये आकारल्याचा आरोप.

सोनई – येथील गजबजलेल्या भागातील काही मुद्रांक (स्टॅम्प) विक्रेत्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारून शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 100 रुपयांच्या मुद्रांकासाठी तब्बल 140 रुपये, तर 500 रुपयांच्या मुद्रांकासाठी 550 रुपये आकारले जात असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुद्रांक खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सोनई परिसरातील सुमारे 15 ते 20 गावांतील नागरिक विविध शासकीय, शैक्षणिक व कायदेशीर कामांसाठी याच ठिकाणाहून मुद्रांक खरेदी करतात. दररोज मोठ्या प्रमाणावर मुद्रांक विक्री होत असल्याने या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवाजवी रक्कम वसूल केली जात असल्याचा आरोप होत आहे.
या प्रकाराची महसूल प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करावी तसेच नागरिकांची होणारी आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी जोरदार मागणी सोनई व परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







