आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
उपनगराध्यक्षOplus_16908288
पीएफ

नेवासा : “आम्ही वीस-पंचवीस वर्षे नेवाशाची घाण साफ केली. कोरोनात जीव धोक्यात घालून सेवा केली. आता आमचेच पीएफचे पैसे द्या हो… ऑपरेशन करायचे आहे,” असा हृदयद्रावक टाहो नेवासा नगरपंचायतीचे निवृत्त स्वच्छता कर्मचारी नाथा साधू चव्हाण (रा. नेवासा खुर्द) यांनी फोडला आहे.

पीएफ

किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या या वृद्ध कर्मचाऱ्याला स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी पत्नीसह अधिकाऱ्यांच्या विनवण्या करण्याची वेळ आल्याने संताप व्यक्त होत आहे.

पीएफ

नाथा चव्हाण यांनी २० ते २५ वर्षे स्वच्छता कर्मचारी म्हणून सेवा बजावली. कोरोनाकाळात स्वतः बाधित होऊनही त्यांनी कर्तव्य पार पाडले. वर्षभरापूर्वी निवृत्त झाल्यानंतर त्यांना किडनीचा गंभीर आजार झाला असून डॉक्टरांनी तातडीच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. सध्या त्यांना युरिन बॅग लावलेली आहे.

पीएफ

पीएफची रक्कम मिळावी म्हणून चव्हाण दांपत्याने सहा महिन्यांपूर्वी नगरपंचायतीसमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी “एक महिन्यात पीएफ खात्यात जमा करू,” असे लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र, पाच-सहा महिने उलटूनही त्यांच्या खात्यात एक रुपयाही जमा झालेला नाही.

पीएफ

निवृत्त कर्मचारी चव्हाण यांच्या पीएफच्या पैशांचा विषय नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. सध्या त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे.ती पूर्ण करून, त्यांना त्यांचे हक्काचे पैसे लवकरात लवकर अदा केले जातील.
– सागर झावरे (कार्यालयीन अधीक्षक, नगरपंचायत नेवासा)

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पीएफ
पीएफ
पीएफ

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पीएफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!