आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
पेट्रोलिंग
पेट्रोलिंग

नेवासा – अवैध वाहतुकीस प्रतिबंध घालणे, गोमांस प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने नेवासा शहरात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पायी पेट्रोलिंग करण्यात आले.

पेट्रोलिंग

सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या दरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह गणपती चौक, नाईकवाडी मोहल्ला, नगरपंचायत चौक, मोहिनीराज मंदिर परिसर तसेच कामिनीचा दर्गा या प्रमुख भागांत पायी गस्त घालण्यात आली.

पेट्रोलिंग

या दरम्यान परिसरातील परिस्थितीची पाहणी करण्यात आली असून नागरिकांशी संवाद साधत कायद्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. शहरात शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासोबतच अवैध वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारचे पेट्रोलिंग नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

पेट्रोलिंग

नेवासा पोलिसांच्या या उपक्रमामुळे शहरात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही यानिमित्ताने देण्यात आला आहे.

पेट्रोलिंग

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पेट्रोलिंग
पेट्रोलिंग
पेट्रोलिंग

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पेट्रोलिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!