
नेवासा – मा. श्री मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यामध्ये अवैध वाळू उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.

वरील आदेशान्वये पो.नि. श्री संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि संदिप दरवडे पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ योगेश कर्डीले, प्रकाश मांडगे यांचे पथक तयार करुन अवैध वाळू उपसा व वाहतुक करणारे इसमांविरुध्द कारवाई करणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले.

दिनांक २०/०७/२०२६ रोजी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन अवैध धंद्याची माहिती काढत असतांना पथकास संत गाडगेबाबा शाळेजवळ एक पांढ-या व लाल रंगाचा ढंपर नेवासा फाट्याकडुन भानसहिवरा गावाकडे जातांना दिसले. पथकाला वाहनाचे संशय आल्याने पथकाने सदरचे वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता, ढंपरमध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या वाहतुक केली जाणारी शासनाच्या मालकीची वाळु दिसुन आली.

पथकाने चालकास ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव १) रोहीदास गुलाब जाधव वय – ३१ वर्षे रा. गंगानगर, ता. नेवासा जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. इसम नामे रोहीदास गुलाब जाधव यास त्याचे कब्जात मिळुन आलेल्या ढंपरचे मालकी बाबत विचारपुस करता त्याने सदरचे ढंपर हे २) कैलास पवार (पुर्ण नाव माहित नाही) रा. गंगानगर, नेवासा, ता. नेवासा जि. अहिल्यानगर (फरार), असे असल्याचे सांगितले.

आरोपीचे कब्जातुन ३०,०००/- रु किमंतीची ३ ब्रास वाळु, ८,००,०००/-रु किमतीची ०१ ढंपर, असा एकुण ८,३०,०००/- रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीविरुध्द पोकॉ/ २५२० प्रकाश नवनाथ मांडगे नेम. स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाणे गु.र.नं. ६२८/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास नेवासा पोलीस ठाणे करीत आहे.
सदरची कारवाई श्री. मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







