
माका प्रतिनिधी ( आदिनाथ म्हस्के ) : – नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता, संस्कार , शिस्त व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पवधीत नावारूपास आलेल्या कै.तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूल ची आषाढी बाल दिंडी लक्षवेधी ठरली.
जय जय राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोष टाळ चिपळी आणि मृदंगाच्या निनादात दिंडीस प्रारंभ झाला. चिमुकल्यांच्या भक्तीपूर्ण सहभागाने संपूर्ण माका गाव भक्तिरंगात न्हाऊन निघाला होता..
दिंडीत संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, वैराग्य मृती चांगदेव महाराज, संत मुक्ताई यांनी भिंत चालवलेला देखावा तसेच विठ्ठल स्वतः जनाबाईस दळण दळू लागतात, तो देखावा व विठ्ठल रुक्मीणी, महादेव पार्वती हे चलत देखावे दिंडीतील मुख्य आकर्षण ठरले

टाळ मृदंगाच्या निनादात निघालेली दिंडी उत्साहात पार पडली. दरम्यान मा का सेवा सोसायटीच्या भव्य मैदानामध्ये पार पडलेल्या रिंगण सोहळ्याने सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
दरम्यान विद्यार्थ्या ना महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा आणि वारी संस्कृतीची अनुभूती देणे संतांनी शिकविलेली समानता बंधुभाव आणि नम्रता ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये बाल वयात रुजावीत म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा .सागर बनसोडे सर यांनी सांगितले
दिंडी सोहळ्यानंतर सर्व बाल वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. दिंडी सोहळा साठी सर्व सन्माननीय शिक्षक,शिक्षिका ,पालक, माता पालक, भजनी मंडळ व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







