आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
शिवकुमार मठपती

नेवासा : जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यानंतरची काल्पनिक वेतनवाढ देण्याबाबत छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिला. सहाव्या वेतन आयोगाच्या पोटी मिळालेली ही काल्पनिक वेतनवाढ हे आपले न्यायालयीन यश असून, यापुढेही कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कायदेशीर प्रक्रियेतून चांगले निर्णय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन नामवंत वकील अॅड. शिवकुमार मठपती यांनी केले.
या न्यायालयीन लढ्यात सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने वकीलपत्र स्वीकारून प्रभावी बाजू मांडल्याबद्दल अॅड. मठपती यांचा देवगड येथे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

शिवकुमार मठपती

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर होते. व्यासपीठावर बन्सीभाऊ आगळे, सौ. साधना पुरकर, भाऊसाहेब पटारे व प्रमोद देशपांडे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष सुरेश पाटेकर तसेच निवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अॅड. शिवकुमार मठपती यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना अॅड. मठपती म्हणाले, “न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाला शासन निर्णयाची जोड मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी मंत्रालयीन स्तरावर एकजूट दाखवून शासन निर्णय मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत.

शिवकुमार मठपती

शासन निर्णय झाल्यास या निकालाचा लाभ सर्व संबंधित सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळू शकेल.” तसेच एडवोकेट मठपती यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊन शंकांचे समाधान केले

यावेळी राजेंद्र मोरगे, कृष्णा शिंदे, बन्सी आगळे व भाऊसाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. न्यायालयीन निर्णयाचा लाभ उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शिवकुमार मठपती

कार्यक्रमास नेवासा तालुक्यासह राहता नगर श्रीगोंदा शेवगाव या तालुक्यातील
राजेंद्र मोरगे,कांतीलाल कुंडारे, भाऊसाहेब अवताडे, मोहम्मद शेख, इकबाल शेख, सुरेश पाटेकर, रवी थावरे, साधना पुरकर, दत्तात्रय भालेराव, एकनाथ वाडगे, अशोक गुंजाळ, दिगंबर कोरडे, कल्पनाताई गायकवाड, जेम्स ससाने, श्रीमती क्षीरसागर, संभाजी घोरपडे, अनंत सदनापूरकर डॉक्टर शिंदे कल्पना जेवढे इकबाल शेख विलासराव दातरंगे यांच्यासह नेवासा, श्रीरामपूर, राहता श्रीगोंदा कोपरगाव व राहुरी तालुक्यातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवकुमार मठपती
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शिवकुमार मठपती
शिवकुमार मठपती
शिवकुमार मठपती

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शिवकुमार मठपती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!