सोनई (संदीप दरंदले) – मस्साजोग ता. केज जि. बीड येथील मराठा आरक्षणात कायम सक्रिय सहभागी असणारे सरपंच पती स्व.संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा निर्दयीपणाने खून केला. या घटनेचे गांभीर्य ओळखून या प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याची मागणी अखंड मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन केली आहे. जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारून कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करणाऱ्या सर्व आरोपिंना तात्काळ अटक करावी, आरोपिंना राजकीय वरदहस्त देणाऱ्यांना व केजच्या पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांचे निलंबन करून त्यांना सहआरोपी करण्यात यावे, हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, घटनेचे प्रत्येक्ष साक्षीदार शिवराज देशमुख व मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देऊन कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे. आमच्या या मागण्यांचा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्यांची पूर्तता करावी अन्यथा अखंड मराठा समाज अहिल्यनगरच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. त्यानंतरच्या होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी हीं सरकारची राहील याची आपण नोंद घावी. असे या निवेदनाद्वारे मागण्या मराठा समाज तर्फे करण्यात आल्या.
यावेळी अखंड मराठा समाज अहिल्यानगरचे काकासाहेब देशमुख, गोरक्षनाथ पटारे, रत्नाकर दरेकर, गोरख भाऊ दळवी, शशिकांत भांबरे, संदीप जगताप, ऍड. गजेंद्र दांगट, राम सातपुते, गिरीश भांबरे, निलेश सुंबे, अमोल पवार, अशोक देवढे, ऍड.मिलिंद घोंगाने, रवींद्र बारस्कर, मिलिंद जपे, वैभव भोगाडे, राम जरांगे,अशोक पवार, संदीप नवसुपे, अभय शेंडगे, जगन्नाथ निमसे, परमेश्वर पाटील, सचिन शिंदे, सखाराम गुंजाळ, गणेश नाईकनवरे, तात्यासाहेब देशमुख, नवनाथ काळे, संतोष आजबे, यांच्यासह अनेक मराठा बांधव उपस्थित होते.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.