ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

Crime News

Crime News : या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याने वारजे पोलिसांनी (Pune Police) संस्थाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता अशी माहिती आहे.

Crime News : पुण्यातील एका शाळेमध्ये डान्स शिकवणाऱ्या शिक्षकाने मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 2022 ते 2024 या दोन वर्षांमध्ये एकूण चार मुलांवर शिक्षकाने अत्याचार केल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. शाळेत मुलांना समुपदेशन केलं जात असताना हा संपूर्ण प्रकार समोर आला. या घटनेनंतर पालकांसह शाळेतील इतर शिक्षकांनी देखील धक्का बसला. या नराधम शिक्षकाची कोर्टाने 22 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान या नामांकित शाळेच्या संस्थाचालकाला अटक करण्यात आली आहे. अन्वित फाटक अस संस्थाचालकाचं नाव आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा केल्याने वारजे  पोलिसांनी (Pune Police) संस्थाचालकाला ठोकल्या बेड्या ठोकल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार गेल्या दोन वर्षांपासून सुरू होता अशी माहिती आहे. 

Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरुड भागातील एका नामांकीत शाळेत मंगेश साळवे या संगीत शिक्षकाकडून गेल्या दोन वर्षांपासून शाळेतील मुलांवर लैंगिक अत्याचार केले जात होते. मंगेश साळवे हा शाळेतील सहावी, सातवी मधील मुलांना अनेकदा शाळेच्या बाथरुममध्ये नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षे ही बाब लक्षात आली नाही. एका मुलाला मंगेश साळवेकडून शारिरीक इजा झाल्यानंतर त्याने ती बाब त्याच्या पालकांना सांगितली. त्यानंतर आणखी तीन पालकांनी देखील त्यांच्या पाल्याबाबत असाच प्रकार घडल्याची तक्रार दाखल केली आहे. 

नेमकं काय घडलंय?

पालकांनी मंगेश साळवे या शिक्षकाबरोबरच संस्थाचालक अन्वित फाटक यांचा आणि संस्थेचा निष्काळजीपणा या अत्याचारांना कारणीभुत ठरल्याची तक्रार पोलीसांकडे केली आहे. पालकांच्या या तक्रारीनंतर पोलीसांनी डान्स शिक्षक असलेला मंगेश साळवे आणि संस्थाचालक अन्वित फाटक यांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याच शाळेतील एकूण चार मुलांच्या बाबतीत अशा घटना घडल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. यातील मुलं ही चौथीमध्ये आणि सहावीमध्ये शिकणारी आहेत, अशी माहिती आहे. 

Crime News

या संपूर्ण प्रकरणानंतर शाळेने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यात शाळा प्रशासनाने “आमच्या शाळेतल्या समुपदेशकांकडून 11 वर्षांच्या एका मुलाला नृत्य शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा प्रकार झाल्याचं सांगितल्याचं आम्हाला समजलं. हा प्रकार कळल्याबरोबर समुपदेशकांनी तातडीने प्रशासनाला याबाबत माहिती दिली. शाळा प्रशासनाने तातडीने पोलिसांना आणि या विद्यार्थ्यांच्या पालकांना याबाबत कळवलं आहे. त्यानंतर या शिक्षकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. तपासादरम्यान याच शिक्षकाने आणखी एका 10 वर्षांच्या मुलाला देखील अशाच प्रकारे स्पर्ष केल्याचं निष्पन्न झालं आहे. याबाबतही स्वतंत्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला आम्ही सर्वाधिक प्राधान्य देतो. या घटनेच्या पार्श्वभुमीवर आम्ही अधिक काळजी घेऊ आणि आमच्याकडे नेमणूक होणाऱ्या स्टाफची पूर्ण तपासणी केली जाईल याची काळजी घेऊ”, असं शाळेने आपल्या प्रसिध्दिपत्रात म्हटलं आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण ? 

पुण्यातील कर्वेनगर परिसरात एका शाळेत आरोपी मंगेश साळवे हा डान्स टीचर म्हणून कार्यरत होता. नृत्य शिकवत असताना साळवे हा शालेय विद्यार्थ्यांच्या शरीराला जाणून बुजून हाथ लावत असे. एका 11 वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्याबाबत घडलेला प्रकार समुपदेशन सुरू असताना सांगितला आणि त्यानंतर त्याच्या आई वडिलांना देखील याबाबतची माहिती दिली आणि तात्काळ त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी सुद्धा प्रकरण गांभीर्याने घेत शिक्षक मंगेश साळवे याला अटक केली. यापूर्वी सुद्धा त्याने इतर विद्यार्थ्यांवर लैंगिक छळ केल्याचे समोर आल होतं. आरोपीवर अशा प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी आणखी एका गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Crime News

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

Crime News
Crime News

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

Crime News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!