गळफास
गळफास

नेवासा – तालुक्यातील सलाबतपुर शिवारात नेपाळी आचाऱ्याची गळफास घेऊन मृत्यू झाल्याची घटना झाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मयत गणेश (नेपाळी पूर्ण नाव माहीत नाही) वय अंदाजे 45 ते 50 हा
रवी राम तांबे व आदेश बाळासाहेब देशमुख, दोघेही राहणार सलाबतपूर यांच्या हॉटेल ७/१२ येथे कामाला होता.

गळफास

दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी १२.५० च्या सुमारास संतोष दिलीप खुळे, यांच्या शेतातील आंब्याचे झाडाला गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला सदर इसमाची हॉटेल मालक यांचेकडे मयत व्यक्ती बाबत काहीही माहिती नाही.

गळफास

त्यामुळे मयताच्या नातेवाईकांचा शोध लागू पर्यंत मृतदेह राखून ठेवण्यात आलेला आहे नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पो.नि.महेश पाटील यांनी सांगितले शिवविच्छेदनानंतर मृत्यूचे निश्चित कारण काय आहे हे स्पष्ट होईल.

गळफास

मयत इसमाचे वर्णन खालील प्रमाणे-

शरीराने सडपातळ, रंग गोरा,
ओळख चिन्ह डाव्या छातीवर तिळ.
नेपाळी असून कूक (स्वयंपाकी) आहे.

मयत व्यक्ती हा कूक/स्वयंपाकी म्हणून काम करीत होता. तो पूर्वी कोणत्या हॉटेल वर कामाला होता याबाबत नातेवाईकांचा शोध घेऊन पोलीस ओळख पटवीत आहेत तरी कोणालाही सदर इसमाची ओळख पटल्यास नेवासा पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करण्याचे आवाहन पो.नि.महेश पाटील यांनी केले आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गळफास
गळफास

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गळफास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!