आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
आरोपी

पीडितेचा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा

नेवासा फाटा (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा आरोप करत पीडितेने येत्या ४ मार्चपासून अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबियांसह आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या प्रकारामुळे नेवासा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तालुक्यात
खळबळ उडाली आहे.

रामडोह (ता. नेवासा) येथे २४ जानेवारी रोजी घडलेल्या घटनेत रोहन अशोक बोरुडे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२ पॉस्को कायदा अंतर्गत कलम ४, ६, ८ व १२ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेला महिनाभराचा कालावधी उलटूनही आरोपी
अटकेत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

उलट आरोपी फिर्याद मागे घेण्यासाठी धमक्या देत असल्याचा आरोप पीडित व तिच्या कुटुंबियांनी केला आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, नाशिक पोलीस महानिरीक्षक जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन पाठविण्यात आले आहे. आरोपी विरुद्ध तातडीने कारवाई करून तसेच अटक न झाल्यास कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत पीडितेने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. दरम्यान, गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप फरार कसा, असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत असून नेवासा पोलिसांच्या कारभारावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

आरोपी
आरोपी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

आरोपी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!