बालाजी देडगाव / प्रतिनिधी : शहापूर ग्रामपंचायतचे वतीने मागासवर्गीय नागरिकांना मोफत जार वाटप व मागासवर्गीय विधवा महिलांना वर्षभर मोफत पाणी वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गावातील सर्व मागासवर्गीय कुटुंबांना मोफत पाण्याचे जार वाटप करण्यात आले तसेच मागासवर्गीय विधवा महिलांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोफत आरो फिल्टर पाणी वाटप करण्याचे ठरले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस कुसुमाग्रज वाचन अभियाना अंतर्गत ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुमारे 350 पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत शहापूरच्या माध्यमातून गावासाठी पाच रुपयात 20 लिटर पाणी हा उपक्रम अविरतपणे चालू आहे. त्यास ग्रामस्थांचा
व पंचक्रोशीतील लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या पाण्यामुळे ग्रामस्थांचे व लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. या कार्यक्रम प्रसंगी शिवाजी कोलते पाटील व संजय वाल्हेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील कोलते, सरपंच मनीषा संदीप कोलते, उपसरपंच सुनील कोलते, सदस्य संभाजी देवकर, गोरक्षनाथ देवकर, भाऊसाहेब मांडे, बापूसाहेब कोलते, ग्रामविकास अधिकारी थिटे मॅडम, संजय वाल्हेकर, लक्ष्मण कोलते, अनिल काळे, भानुदास कोल्हे, रामकिसन इंगळे, अमोल वाल्हेकर, अशोक कारभोळ, अशोक कोलते, सिताराम शिंदे, संजय कोलते, भागचंद कोलते, बाबासाहेब काळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







