शनिशिंगणापूर – नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील आठवडे बाजारासाठी गेलेल्या झापवाडी येथील व्यक्तीची मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत भाऊसाहेब रखमाजी जरे रा. झापवाडी यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेलो असता मांडे मोरगव्हाण रोडवरील डॉ. भालेराव यांच्या हॉस्पिटल शेजारी लावलेली गाडी बाजार करून येईपर्यंत अज्ञात चोरट्यांनी हिरो होंडा काळ्या कलरची एमएच १७ बीआर ५१५६ या क्रमांकाची मोटरसायकल चोरुन नेली. सोनई पोलीस ठाण्यात याबाबत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय गावडे करत आहेत


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

