बीड –बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मास्टरमाईंड वाल्मिक कराड याला आता देशाच्या सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे: न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने आरोपीचा जेलमधील मुक्काम आता कायम राहणार आहे.९ डिसेंबर २०२४ रोजी बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे खंडणीच्या वादातून अपहरण करण्यात आले होते. या
अपहरणाचे रूपांतर पुढे निघृण हत्येत झाले.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, वाल्मिक कराड हा या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली होती, ज्याचा मास्टरमाईंड कराड असल्याचे तपासात समोर आले होते.
कनिष्ठ ते सर्वोच्च न्यायालय जामीनपात्र प्रवास
वाल्मिक कराडला अटक झाल्यापासून त्याने जामिनासाठी वारंवार प्रयत्न केले. यापूर्वी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि तपासातील पुरावे लक्षात घेऊन त्याचा जामीन फेटाळला होता.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.







