आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
लग्न

पाचेगाव फाटा – सध्या फेब्रुवारी महिना संपून मार्च महिनेचा प्रारंभ झाला आहे.त्यात यावर्षी अति उन्हाच्या झळा जाणू लागल्याने नागरिक अनावश्यक घर बाहेर फिरणे टाळत आहे.पण त्यात सध्या लग्नसराई देखील जोरात चालू असल्याने नागरिकांना लग्न समारंभाचे आग्रहाचे निमंत्रण दिल्याने विवाह स्थळी जावे लागते आणि जावे देखील ,पण लग्नाची दिलेली वेळ टळून अक्षरशः दीड ते दोन तासाने लग्न सरस उशीर लागत असल्याने नातेवाईकांना बरोबर वऱ्हाडी मंडळ थाटकळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

त्यात आता नवीन पध्दत सुरू करण्यात आली,त्यामध्ये सकाळी वैद्यकीशास्त्र पध्दतीने लग्न लावले जातात,नंतर मग नातेवाईक व वऱ्हाडी मंडळ लग्नस्थळी आल्यानंतर पहिले जेवण आणि जेवण झाले की मंगलकार्यालयात येऊन नवरदेव व नवरीची प्रतीक्षा करणे.त्यात काही नातेवाईक व वऱ्हाडी मंडळ जेवण करून निघून देखील जातात.त्यामुळे भविष्यात लग्न वेळ काढल्यानंतर तरी लग्न वेळेवर लावण्यात यावे.जेणेकरून आपल्या लग्नसमारंभात आलेला प्रत्येक नातेवाईक व वऱ्हाडी वधूवरावर अक्षदा रुपी आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी थांबतील,अन्यथा हे असेच चालू राहिले तर मात्र नातेवाईक सह वऱ्हाडी मंडळ देखील जेवण झाल्यानंतर निघून जातील.

लग्न

वाजवी पेक्षा खर्च टाळून शास्र पध्दतीने वेळेनुसार विवाह सोहळा संपन्न झाला पाहीजेन.त्यात आपण लग्न पत्रिका देखील जवळपास बंद करून सोशल मीडियावर भर देत सर्व नातेवाईकांना लग्नपत्रिका पाठवतो.त्यात वेळ,खर्च व होणारे अपघात टाळण्यासाठी मोठी मदत झाली. पण आजून लग्नसमारंभात अमाप पैसा खर्च करून गरज नसणाऱ्या गोष्टी देखाव्यासाठी करण्यात येत आहे.पण हे लग्न परत परत होत नाही,पण मग पैसा खर्च करणे कितपत योग्य ठरतो. तोच पैसा नवरा नवरीच्या भविष्यातील स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी त्यांना मदत करावी.

कोरोनाच्या काळातील लग्नसमारंभ आपण पाहिले,त्यात मोजके नातेवाईक व वऱ्हाडी मंडळ,त्यात लग्न वेळेच्या आता लावले जात,कोणत्याही प्रकारचे वाध्य नाही,कोणताही सत्कार समारंभ नाही.कोणतेही आशीर्वाद नाही.कोणत्याही प्रकारचे फोटो शेषन नाही,प्रिव्हिडिग नाही.डिजेचा किरक्ष आवाज नाही.यावर फक्त कोरोना सारखा महाभयंकर रोगाने आळा घालण्यासाठी मोठी मदत झाली,पण कोरोना काळ गेल्यानंतर पुन्हा तोच खर्च आणि ताल पाहायला मिळत आहे.पण हे थांबविण्यासाठी कोरोना परत म्हणाल पाहीजेन की,मी पुन्हा येईन.

मार्च २०२६ मध्ये विवाहासाठी सात तिथी,तर एप्रिल मध्ये पाच, मे महिन्यात ९ तिथी,जून मध्ये सहा, तर जुलै महिन्यात आठ शुभ मुहूर्त असून,जवळपास मार्च, एप्रिल व मे या अति उन्हाच्या तीन महिन्यांत२१ तारखा लग्नतिथीसाठी उत्तम मानल्या गेल्या आहे.त्यामुळे अति उन्हाच्या झळा यंदा जास्त प्रमाणात जाणवणार असल्याने वेळेत लग्न सोहळा साजरा करण्यात येण्याचा वऱ्हाडी मंडळी बरोबर नातेवाईकांनी आशा व्यक्त केली आहे.

लग्न

लग्न जमवताना देणे घेणे बद्दल तर दोन्ही बाजूंनी बोलणी केली जाते,पण दिलेल्या वेळेत लग्न समारंभ वेळेत लावू किंवा लावले जावे असा आग्रह देखील धरला जावो.नवरदेव पुढे आनंद उत्सव साजरा करणाऱ्याना थोडी तंबी देण्यात येऊन वेळ व खर्च वाचविण्यासाठी भर देण्याची गरज आहे. असे लग्न वेळेच्या पुढे लग्न समारंभ पार पडले तर मात्र भविष्यात वऱ्हाडी व नातेवाईक जेवण करून आपल्याला घरी जातील. त्यामुळे आपल्याला वाटत असेल की आपल्या लग्न समारंभात सर्वांची उपस्थिती प्राथनि आहे,तर लग्न विवाह सोहळा वेळेत पार करावा.

लग्न

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लग्न
लग्न

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लग्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!