चार पाच दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी पाच बिबट्याचे दर्शन, पिंजरा लावण्याची मागणी.
पाचेगाव फाटा (वार्ताहर) नेवासा तालुक्यातील पाचेगाव कारवाडी परिसरात सध्या बिबट्याच्या दर्शनाने दहशत निर्माण होऊन नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की,पाचेगाव पुनतगाव शिवा असलेल्या पोपट बाराहाते यांच्या उसाच्या लागवडी साठी ठेवलेल्या अर्धा एकर मध्ये गावातील श्याम मकासरे यांनी काल सोमवार रोजी सकाळी नऊच्या सुमारास पाहियला,त्यानंतर गावातील तरुणांना फोन वर संपर्क करून सर्व हकीकत सांगितली.त्या घटनेची सर्वत्र चर्चा झाल्याने काही तरुण बिबट्याला पळून लावण्यासाठी तर काही पाहण्यासाठी जमा झाले.

त्यात जवळपास एक तासभर प्रयन्त २५ ते ३० तरुण मोठा आवाज करीत त्या उसाच्या क्षेत्रातून बिबटयाला पळून लावण्यात यश मिळेल आहे.याच्या अगोदर दोन दिवसांपूर्वी तिथेच शरद देठे यांच्या पाळीव कोंबड्यावर बिबट्याने डल्ला मारला होता.पाच दिवसांपूर्वी कारवाडी परिसरात एक शेड मध्ये दोन ते तीन बिबटया सी सी कॅमेऱ्यात कैद झाले आहे.त्यामुळे कारवाडी पाचेगाव परिसरात बिबटयाचे वावर असून नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता तरुणांनी जास्त आरडाओरडा न करता माघारी जाण्याचा सल्ला दिला होता,

कारण बिबटया आवाजाने तरुणांवर हल्ला देखील करू शकतो असे सांगण्यात आले,पण तरुणांनी एकत्र येत बिबटयाला त्या जागेवरून पळून लावले आहे.तरी या परिसरात बिबटयाचा वावर असल्याने वनविभागाच्या माध्यमातून लवकरात लवकर बिबटया जेलबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात येण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
त्या परिसरात नागरिकांच्या वस्त्या असल्या कारणाने तरुणांनी बिबटया पळून लावला.त्यात श्याम मकासरे,शरद देठे,भरत देठे,रवी देठे,जालिंदर मोरे,लखन तुवर,सलमान पटेल,सत्तर पटेल,बाबू पटेल,राहुल देठे,संतोष राक्षे, सोनू देठे,महेश मांजरे, उमेश मांजरे,संपत गवळी,विजू देठे,असिफ पटेल,मोजीम पटेल,अहमद पटेल,गणेश मोरे,विशाल राक्षे,आण्णा देठे,संदीप पवार,विष्णू पवार,सतीश देठे,बापू देठे,राजू माळी आदी तरुणांनी बिबटया उसाच्या क्षेत्रातून पळून लावण्यासाठी मदत केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

