भेंडा : भेंडा बुद्रुक (ता.नेवासा) बसस्थानक चौकातील हॉटेल स्वागत मध्ये बुधवारी रात्री चोरी करून बाहेर पडलेल्या चोरट्यास रंगेहात पकडून कारखाना सुरक्षा रक्षकांनी कुकाणा पोलीसांच्या हवाली केले. मात्र पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल न करता त्यास लगेच सोडून का दिले असे सुनील गव्हाणे यांचे म्हणणे आहे.पोलिसांच्या या भूमिके बाबत भेंड्यात जोरदार चर्चा चालू आहे.

स्वागत हॉटेलमध्ये स्वयंपाक घरातील एक्झॉस्ट फॅनच्या खिडकीतून एक चोरटा आत घुसला व त्याने गल्ल्यातील काही चिल्लर, नोटा, मोबाईल व साहित्याची चोरी केली. तो हॉटेलच्या बाहेर पडल्यानंतर कारखाना सुरक्षा रक्षकाच्या हे लक्षात आले. त्याने इतर सुरक्षारक्षक मदतीला बोलावून त्याचा पाठलाग करून त्यास पकडले.सर्वांनी त्याचे कडे चौकशी केली असता हॉटेलमध्ये चोरी केल्याचे त्याने कबूल केले. त्याच्याकडे नोटांचे बंडल, चिल्लर, व एक मोबाईल आढळला. कुकाणा पोलिसांना संपर्क केल्यानंतर ते घटनास्थळी आले व त्यास ताब्यात घेतले. हॉटेल स्वागतचे मालक सुनील गव्हाणे ही घटनास्थळी आले व आपली चिल्लर नोटा व हॉटेलमध्ये ग्राहकाचा ठेवलेला मोबाईल ओळखला.

कारखाना सुरक्षा अधिकारी व रक्षकांनी त्या चोरट्यास कुकाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र कुकाणा पोलिसांनी त्याची कोणती चौकशी व कारवाई न करता त्याला भेंड्यातच सोडून दिले. पोलिसांच्या या शंकास्पद वर्तनामुळे कारखाना सुरक्षा रक्षक हतबल व नाराज झाले. यापूर्वी बसस्थानक परिसरात पत्रे उचकटून अनेकांच्या दुकानात चो-या झालेल्या आहेत त्याचा तपास पोलीस लावू शकलेले नाहीत. विशेष म्हणजे चोरी करताना पकडलेल्या व्यक्तीस पोलिसांनी असे का सोडले ? पोलिसांच्या या संशयास्पद कृतीमुळे यापूर्वी झालेल्या चो-यांबद्दल व्यावसायिकांकडून संताप व्यक्त होत आहे. यामुळे चोरी झाली तरी तक्रार देण्यास नागरिक टाळाटाळ करतात.
हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दाखवलेले आहे.चोरी केल्यानंतर मुद्देमालासह पकडलेल्या चोरट्यावर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र त्यास पोलिसांनी का सोडले हे समजले नाही.
सुनील गव्हाणे, स्वागत हॉटेल – भेंडा
चोरट्यास मारहाण झाली होती तो दवाखान्यात उपचार घेतोय. हाॅटेल मालकांनी तक्रार दिली की कारवाई करू.
– महेश पाटील – पोलीस निरीक्षक – नेवासा

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






