आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
अपघात
अपघात

कल्याण–आहिल्यानगर मार्गावरील टोकावडे येथे मंगळवार, दि. ५ मे रोजी झालेल्या बस आणि स्कॉर्पिओ कारच्या भीषण अपघातात भेंडा–वडाळा येथील चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील अंगणवाडी सेविका सौ. मीना कल्याण मडके (वय ५५ वर्षे) आणि सौ. निता अशोक डूरे (वय ५५ वर्षे) या, तसेच वडाळा येथील त्यांचे मावस भाऊ अविनाश रामचंद्र काकडे (वय ५८ वर्षे), अभिषेक भाऊसाहेब मोटे (वय ३८ वर्षे), सौ. मोनिका अभिषेक मोटे (वय ३२ वर्षे), आराध्या अभिषेक मोटे (वय १३ वर्षे), वेदांत अभिषेक मोटे (वय ३ वर्षे) आणि सलाबतपूर येथील सौ. मनीषा रामदास कोहक (वय ५० वर्षे) हे सर्व नातेवाईक मंगळवार, दि. ५ मे रोजी पहाटे वडाळा येथून स्कॉर्पिओ गाडीने आजारी असलेल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी मुंबईकडे निघाले होते.

अपघात

सकाळी सुमारे १०:३० वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी–कल्याण–आहिल्यानगर मार्गावर धावणाऱ्या एसटी बस आणि स्कॉर्पिओ गाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. विठ्ठलवाडी आगारातून कल्याण–आहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बस आणि स्कॉर्पिओ गाडीचा मुरबाड (जि. ठाणे) तालुक्यातील टोकावडे–वैशाखरे हद्दीत हा अपघात झाला.

या अपघातात भेंडा बुद्रुक येथील सौ. मीना कल्याण मडके (वय ५५ वर्षे) व सौ. निता अशोक डूरे (वय ५५ वर्षे), तसेच वडाळा येथील अविनाश रामचंद्र काकडे (वय ५८ वर्षे) व अभिषेक भाऊसाहेब मोटे (वय ३८ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. तर सौ. मोनिका अभिषेक मोटे (वय ३२ वर्षे), आराध्या अभिषेक मोटे (वय १३ वर्षे), वेदांत अभिषेक मोटे (वय ३ वर्षे) आणि सौ. मनीषा रामदास कोहक (वय ५० वर्षे) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींवर अपघातस्थळाजवळील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मीना मडके व निता डूरे यांच्यावर भेंडा येथे, तर अभिषेक मोटे व अविनाश काकडे यांच्या पार्थिवावर वडाळा येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जखमींवर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने भेंडा परिसरावर शोककळा पसरली आहे.

अपघात
अपघात

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

अपघात
अपघात
अपघात

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

अपघात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!