
नेवासा – श्री क्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील सुविधा, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत व मानाच्या सोहळ्यात सहभाग करावा या निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुबंई येथे भेट घेतली.
बैठकीत वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवा, निवारा, पाणी आणि रस्ते सुधारणा यांसारख्या आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करण्याबाबत चर्चा मागणी करण्यात आली, जेणेकरून हा सोहळा सुलभ व सुरक्षित होईल
पालखी मार्गावरील पुरेसे पाणी आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे.
वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त आणि आरोग्य शिबिरांची स्थापना करणे अश्या विविध मागण्यांसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्त मंडळाने दि. २४ रोजी मंगळवारी मुबंई येथे विधान भवनात भेट घेतली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील सदर मागणीचे पत्र देण्यात आले. तसेच पालखी सोहळ्या बाबत आ मोनिकताई राजळे व संस्थानचे विश्वस्त व वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी पालखी सोहळ्या बाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे,आमदार मोनिकाताई राजळे,संस्थानचे महंत वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, ह.भ.प रामनाथ महाराज झिंजुर्के,ह.भ.प. भगवान महाराज जंगले शास्त्री,विश्वस्त कैलास जाधव, कृष्णा पिसोटे, जनसंपर्क अधिकारी आशिष कावरे,भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संदीप खराड,यांच्यासह तालुक्यातील प्रमुख वारकरी मंडळी उपस्थित होते.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी म्हणून ओळख असलेल्या नेवासा पुण्यभूमीत आतंरराष्ट्रीय ज्ञानपीठाचा दर्जा देऊन मराठी भाषेचे ज्ञानपीठ उभारावे अशी देखील आग्रही मागणी विश्वस्त कैलास जाधव यांनी मुख्यमंत्री यांच्या कडे केली .

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.






