आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
आम्ही नेवासकर न्युजवर विश्वास असणाऱ्या वाचकांची संख्या :
193500+
गुन्हा

अज्ञातांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा; शेतकऱ्याचे सुमारे १२ हजारांचे नुकसान

घोडेगाव – नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात शेतात अनाधिकृत प्रवेश करून कांदा पिक व पाण्याची मोटार चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदकिशोर कचरुदास बंग (वय ६६, व्यवसाय शेती) यांच्या गट क्रमांक १३२/१ येथील शेतात दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.०० ते ६.०० या वेळेत आरोपींनी प्रवेश केला. आरोपींमध्ये सोमनाथ एकनाथ लष्करे, राहुल सोमनाथ कुसळकर अजय केशव लष्करे, रमेश शेटीबा कुसळकर विकास विठ्ठल कुसळकर यांचा समावेश असून त्यांच्यासोबत एक अनोळखी पुरुष व एक महिला असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

चोरी


आरोपींनी फिर्यादीच्या शेतातील सुमारे १२ हजार रुपये किमतीचा कांदा व पाण्याची मोटार जबरदस्तीने नेल्याचा आरोप आहे. तसेच शेतातील कांदा पिकामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर फिरवून मोठे नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस हवालदार वाघकर यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली आहे. प्रकरणाचा तपास सोनई पोलिस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

चोरी
चोरी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

चोरी
चोरी
चोरी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

चोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!